शेळगांव आर येथे कोव्हिड-१९ तपासणी शिबीर संपन्न

वैराग । प्रतिनिधी
२७ मे २०२१ रोजी जस्ट फॉर हार्ट्स ऑर्गनायजेशन, पुणे , श्री राम प्रतिष्ठान शेळगांव (आर) ,मावळा प्रतिष्ठान, शेळगांव (आर) , व शेळगांव (आर) ग्राम पंचायत यांच्या सौजन्याने कै . विनायकराव सोपान गायकवाड यांच्या तृतीय पुण्यस्मरणार्थ कोव्हिड-१९ तपासणी शिबीर संपन्न झाले . शिबीराचे उद्घाटन वैराग पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक विनय बहिर यांच्या हस्ते करण्यात आले .

कै .विनायकराव सोपान गायकवाड यांच्या स्मरणार्थ शिबीराचे आयोजन

शिबिरामध्ये महिला – पुरुषांची आरोग्य तपासणी करून व कोरोना च्या लक्षणांची तपासणी करण्यात आली यामध्ये १०० पेक्षा जास्त संशयित व्यक्तींच्या रॅपिड अँटीजेन टेस्ट घेतल्या . यामध्ये बाहेर गावातील केवळ ३ व्यक्ती कोरोना संक्रमित आढळून आल्या. कोरोना टेस्ट पॉसिटीव्ह आलेल्या पेशन्टना रूपये ३००० किमतीचे १४ दिवसांचे औषधाचे किट मोफत देण्यात आले व त्यांना जवळच्या सरकारी कोविड सेंटर मध्ये पाठवण्यात आले. तसेच इतर सर्वाना रोग प्रतिकार शक्ती वाढवण्यासाठी औषधे व मास्कचे वाटप करण्यात आले.
यावेळी शेळगांव आर ग्रामपंचायतीचे उपसरपंच – शाहू कचरे, ग्रामसेवक व इतर सर्व सदस्य , प्रकाश गायकवाड, लक्ष्मण गायकवाड सर, सुरेश अडसूळ ,सोमनाथ कचरे, श्रीराम प्रतिष्ठानचे अमोल देवकर, मनोज वडणे , मावळा प्रतिष्ठान सदस्य , ग्रामस्थ उपस्थित होते.

शिबिरातील सर्व डॉक्टर आणि आरोग्य सेवकांना ” स्वराज्य पोलीस मित्र, पत्रकार संरक्षण व माहिती अधिकार” संघटनेच्या वतीने ‘कोरोना योद्धा ‘ म्हणून प्रशस्तीपत्र देऊन गौरवण्यात आले.
डॉ . रवींद्र कुलकर्णी यांनी गावातील लोकांना कोरोना , लसीकरण अशा अनेक विषयांवर मार्गदर्शन केले.
शिबिरात सेवा देणारे डॉक्टर व आरोग्य सेवक
१) डॉ. रविंद्र ल. कुलकर्णी (MD)
२) डॉ दत्तात्रय सूर्यवंशी (MD)
३) डॉ मनीषा देवकर (MD)४) अर्चना सोनावणे५) राजेश चक्रवर्ती ६) तात्यासो मोरे
७) रतीश भोर
कार्यक्रमात सुरुवातीला कै .विनायकराव सोपान गायकवाड यांच्या स्मृतिस अभिवादन करण्यात आले .कोव्हिड प्रतिबंधक शासकिय नियमांचे पालन करित कोव्हिड-१९ तपासणी शिबीर संपन्न झाले .

Share Now

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *