वाढदिवसाच्या खर्चाला फाटा देत कोरोना वॉरीयर्सचा सन्मान ,शिवस्पर्श प्रतिष्ठाणचा अनोखा उपक्रम


वैराग (प्रतिनिधी)वाढदिवसाच्या खर्चाला फाटा देत मंगळवार ४ मे रोजी वैराग येथिल शिवस्पर्श प्रतिष्ठाणने कोरोना वॉरीयर्सचा सन्मान केला व साहित्य वाटप करून अनोखा वाढदिवस साजरा केला .
शिवस्पर्श प्रतिष्ठाण नेहमी समाजोपयोगी उपक्रम राबवित असते . प्रतिष्ठाण चे सदस्य श्री . विकी चंद्रकांत मचाले यांच्या वाढदिवस होता .विकी मचाले व प्रतिष्ठाण चे सर्व सदस्य यांनी वैराग ता . बार्शी येथे मोहोळ रोडवर संतनाथ कोवीड सेंटरला भेटून कोरोना रुग्णांवर उपचार करणारे डॉक्टर , सर्व कर्मचारी यांना गुलाब पुष्प देत त्यांचा सत्कार करून त्यांना प्रोत्साहन देण्याचा अनोखा उपक्रम राबविला .
यावेळी डॉ .अतुल पाटील व आरोग्य कर्मचारी , वैराग ग्रामपंचायत चे ग्रामविकास अधिकारी श्री सचिन शिंदे व त्याचे सहकारी यांचा गुलाबपुष्प देऊन सत्कार करण्यात आला . याप्रसंगी वाढदिवसाचा खर्च टाळून सेंटर ला आवश्यक असणारे मास्क,सॅनिटायझर, झाडू व स्वच्छता साहित्य अश्या आवश्यक वस्तूंचे वाटपही करण्यात आले.


याप्रसंगी शिवस्पर्श प्रतिष्ठाणचे सदस्य -विकी चंद्रकांत मचाले,अध्यक्ष – गणेश मचाले , रुपेश पालकर,विनय तपासे,अभि येळणे ,फैय्याज तांबोळी,उत्कर्ष डुरे व शिवस्पर्श प्रतिष्ठाणचे संस्थापक – अजय काळोखे उपस्थित होते .

Share Now

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *