जलसंजीवनी प्रकल्पामार्फत ५ गावच्या शेतकर्‍यांसाठी अभिसरण कार्यशाळा संपन्न

वैराग । प्रतिनिधी
जॉन डियर अर्थसहाय्य , युनाटेड वे मुंबई यांच्या संकल्पना आणि कृषी विकास व ग्रामीण प्रशिक्षण संस्था अमलबजावणी यंत्रणा असलेल्या जलसंजीवनी प्रकल्पाअंतर्गत  २२ मे शनीवारी सकाळी ११ वा . अभिसरण वेबिनारचे घेण्यात आले.  झूम अॅपवर झालेल्या या वेबिणार मध्ये कृषी विकास व ग्रामीण प्रशिक्षण संस्थेचे मुख्य कार्यकारी अधिकारी – अमित नाफडे, सहकार मंत्री यांचे ओएसडी -संतोष पाटील, कृषी भूषण -अंकुश पुडवळे, वरिष्ठ भूवैज्ञानिक -मुस्ताक शेख, कृषी अधिकारी – नानासाहेब लांडगे आदी मान्यवरांनी मार्गदर्शन केले.

कोविडमुळे वेबीनारव्दारे शेतकऱ्यांना एकत्र करीत प्रकल्पातील ग्रामस्थ, जास्तीत जास्त शेतकऱ्यांना  शासकीय योजनांची माहिती देणे, त्यांना लाभ घेणेसाठी शासकीय अधिकारी यांच्या मार्फत मार्गदर्शन देण्यात आले.

जलसंजीवनी प्रकल्प बार्शी तालुक्यात यावली, उंडेगाव, सुर्डी, इरले आणि रस्तापूर या पाच गावात ऑगस्ट २०१८ पासून कार्यरत आहे. याअंतर्गत होत असलेल्या जलसंधारण, कृषी विकास,  पशुसंवर्धन, महिला सक्षमीकरण विभागातील उपक्रमांना शासकीय योजनांची जोड देण्यासाठी तसेच स्थानिक शासकीय अधिकारी आणि ग्रामस्थ यांच्यातील संवाद घडविण्यासाठी या वेबिणारचे आयोजन करण्यात आले होते.

या वेबिणार मध्ये यावली, उंडेगाव, सुर्डी, इर्ले आणि रस्तापूर या गावातील ग्रामस्थ व शेतकरी उपस्थित होते.
   या वेबीणार मध्ये जलसंजीवनी प्रकल्पाचे संचालक -किशोर सुतार, सुर्डी गावचे मधूकर डोईफोडे, कार्यक्रम अधिकारी – समीर शेख, अनुराधा गायकवाड, पाच गावचे महिला व पुरुष , ग्रामसमन्वयक आदी सहभागी होते. या वेबिणार चे प्रस्ताविक व आभार प्रकल्प व्यवस्थापक -भिमाशंकर ढाले यांनी केले. तर  सुत्रसंचालन कार्यक्रम अधिकारी -अजिज तांबोळी यांनी केले.

Share Now

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *