वैराग येथे पत्रकारांचा गौरव करून संविधान दिन साजरा


वैराग (प्रतिनिधी) येथील अण्णाभाऊ साठे नगर येथे गुरुवार २६ रोजी संविधान गौरव दिना निमित्त पत्रकारांचा संविधानाची प्रत व उद्देशिका देवून गौरव करण्यात आला. तसेच संविधाना बद्दल विविध मान्यवरांनी आपले विचार व्यक्त करून संविधान दिन साजरा करण्यात आला.
भारताचे संविधान २६ नोव्हेंबर, १९४९ रोजी संविधानसभेने स्वीकृत केले होते.या घटनेला ७० वर्षे झाली असून याची आठवण म्हणून २६ नोव्हेंबर रोजी भारतीय संविधान दिन साजरा होतो. या निमित्ताने लोकशाहीर अण्णाभाऊ साठे नगर येथे संविधान दिन साजरा करण्यात आला .
यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष – जय जगदंबा बहुउद्देशीय संस्था सर्जापूरचे अध्यक्ष – डॉ. कपिल कोरके होते .
ग्रामीण पत्रकार असोसिएशनचे सचिव -आनंदकुमार डुरे , अध्यक्ष -किरण आवारे , खजीनदार -प्रा. बलभीम लोखंडे, अण्णासाहेब कुरुलकर , गणेश अडसूळ , कुलभूषण विभुते या पत्रकारांचा संविधानाची प्रत व उद्देशिका देऊन मान्यवरांच्या हस्ते सन्मान करण्यात आला .
यावेळी राष्ट्रवादीचे नेते – निरंजन भूमकर यांनी तरुणांना व्यसनाधिन न होता शिक्षण , व्यवसाय , नोकरी साठी परिश्रम घेण्याचा सल्ला दिला .
डॉ .कपील कोरके म्हणाले की ” , संविधान सभेने आजच्या दिवशी संवीधानास मान्यता दिली व ते पुढे अंमलात आणले म्हणून आपण २६ नोव्हेंबर संविधान दिन साजरा करत असल्याचे सांगितले . तसेच संविधान निर्मिती , संविधानाचे महत्व ,डॉ .आंबेडकर यांचे योगदान आदी विषयी आपले विचार मांडले .
मौलाना अब्बास म्हणाले “, देशातील गरीब – श्रीमंत , सर्व जाती – धर्म व सर्व घटकांचा विचार करून जे संविधान तयार झाले त्यास सर्व तज्ञ मंडळीनी मान्यता दिली . त्यामुळे संविधानाचे अनन्य साधारण महत्व आहे .
यावेळी – राष्ट्रवादीचे नेते -निरंजन भूमकर, दलित स्वयंसेवक संघाचे -भारत ठोंबरे प्रज्योत भालशंकर, मा. ग्रा.प. सदस्य साहेबराव वाघमारे ,वंचितचे तालुकाध्यक्ष – समाधान भालशंकर, आरपीआयचे तालुका अध्यक्ष – दत्तात्रय क्षिरसागर , वैराग शहर अध्यक्ष – दीपक लोंढे ,राष्ट्रवादी तालुका अध्यक्ष -राजकुमार पौळ , राष्ट्रवादी काँग्रेस अल्पसंख्यांक सेलचे जिल्हा उपाध्यक्ष -मौलाना अब्बास शेख,भरत काकडे ,भारत देशमुख, दिलीप जाधव , सलीम शेख आदी मान्यवर उपस्थित होते.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन दलित मित्र प्रशांत भालशंकर यांनी तर आभार आतिश कांबळे यांनी मानले.
प्रारंभी मुंबईतील २६/११ च्या हल्ल्यात शहीद झालेल्या हुतात्म्यांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. याप्रसंगी भारतरत्न डॉ . बाबासाहेब आंबेडकर व लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या प्रतिमेचे पूजन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.

Share Now

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *