वैराग भागातील एसटी बस ची सेवा पुर्ववत करण्याची नागरिकांची मागणी


मुंगशी प्रतिनिधी ( काशीनाथ क्षीरसागर )
वैराग ते उपळे व वैराग ते भातंबरे ही एसटी बस सेवा पूर्वीप्रमाणे चालु करण्याचे निवेदन लाडोळे ग्रामस्थांतर्फे शिवाजी जाधव यांनी बार्शी आगार प्रमुख यांना दिले आहे .
लॉकडाउन काळात महामंडळाची बस सेवा बंद होवून सुमारे ७-८ महिने झाले . २७ जानेवारी पासून जिल्हयात सर्वत्र ५ वी ते ८ वी च्या सर्व शाळा सुरु झाल्या आहेत . तसेच यापुर्वी ९वी ते १२ वी चे वर्ग सुरु झाले होते .त्यामुळे शाळा – कॉलेज पूर्वी प्रमाणे सध्या नियमित सुरु झाले आहेत .
वैराग हे शैक्षणिक केंद्र असून येथे वैराग भागातील अनेक खेड्यातील विद्यार्थी येथे शिक्षण घेतात ,त्यामुळे एस टी बस सुरू नसल्याने सध्या त्यांच्या शिक्षणाची गैरसोय होत आहे.
यासाठी बार्शी आगाराने वैरागला जोडणाऱ्या खेड्यातील बसच्या फेऱ्या त्वरीत चालू कराव्यात अशी पालक , विद्यार्थी ,प्रवाशी आदींची मागणी जोर धरत आहे .वैराग ते उपळे व वैराग ते भातंबरे एसटी बंद असून येथील विद्यार्थ्यांची गैरसोय होत असल्याने ही बस लवकरात लवकर चालू करणेची मागणी लाडोळे ग्रामस्थांनी देखिल केली आहे.

लाडोळे ग्रामस्थांतर्फे शिवाजी जाधव यांनी बार्शी आगार प्रमुखांना दिले निवेदन .
Share Now

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *