राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा वर्धापन दिन साजरा


वैराग (प्रतिनिधी) राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या
22 व्या वर्धापनदिनानिमित्त बार्शी तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी च्या वतिने वैराग येथे पक्षाच्या संपर्क कार्यालयात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा झेंडा फडकवुन व वृक्षारोपण करून वर्धापन दिन साजरा करण्यात आला .

शरद पवार साहेबांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्राच्या आणि देशाच्या उद्योग, कला, क्रीडा, साहित्य, सहकार, शेती, समाजकारण, राजकारण या सर्वच क्षेत्रात मोलाचं योगदान देणारा, जनहितासाठी सदैव दक्ष असा
राष्ट्रवादी काँग्रेस असल्याचे निरंजन भूमकर यांनी आपल्या मनोगतामध्ये व्यक्त केले .
यावेळी तालुक्याचे नेते निरंजन भुमकर , तालुका अध्यक्ष – राजकुमार पौळ , अल्पसंख्याक जिल्हा उपाध्यक्ष – मौलाणा अब्बास कादरी , रफिक बेग ,ग्रामपंचायत सदस्य -हनुमंत पांढरमिसे ,सलिम शेख , शहराध्यक्ष – बाबा शेख , महंमद शेख , महेश हुच्चे व राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे पदाधिकारी , कार्यकर्ते उपस्थित होते.

Share Now

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *