जगदाळे हॉस्पिटलमध्ये नाकामधून दुर्बिणीद्वारे डोळा व मेंदू दरम्यानच्या गाठीची यशस्वी शस्त्रक्रिया

बार्शी (प्रतिनिधी) जगदाळे मामा हॉस्पिटल, बार्शी येथे डॉ किशोर उद्धवराव गोडगे (MCH न्यूरोसर्जन)कार्यरत आहेत .
एका ३५ वर्षीय व्यक्तीला डोके दुखणे, चक्कर येणे व डोळ्यांनी व्यवस्थित न दिसणे हा त्रास जाणवू लागला .म्हणून डॉ. किशोर गोडगे (न्युरोसर्जन) यांनी तपासणी केली असता त्यांच्या लक्षात आले की डोळ्या कडील नसांवर मेंदूमध्ये तयार झालेली गाठ दाब देत होती त्यामुळे दृष्टीही अधू चाललेली होती. त्यानंतर ऑपरेशनचा निर्णय घेतला. डॉ. किशोर गोडगे यांनी ३ ते ४ तास चाललेले ऑपरेशन यशस्वी केले. नाकामधून दुर्बिणीद्वारे डोळा व मेंदू यामध्ये असणारी गाठ यशस्वीरित्या काढून टाकण्यात आली.ऑपरेशन झाल्यानंतर चौथ्या दिवशी पेशंटला घरीही सोडण्यात आले.जे ऑपरेशन मुंबई पुण्यासारख्या ठिकाणी करण्यात येत होते ही सुविधा जगदाळे मामा हॉस्पिटल बार्शी येथे कोरोना काळातसुद्धा उपलब्ध करून दिल्याबद्दल नागरिकांमधून समाधान व्यक्त करण्यात येत आहे.

Share Now

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *