साकत येथे शिवजंयती निमित्त ७५ जणांचे रक्तदान

बार्शी तालुक्यातील साकत येथे बापूसाहेब घोरपडे युवा मंच, साकत व भगवंत ब्लड बँक बार्शी यांचे संयुक्त विद्यमाने सालाबादप्रमाणे याहीवर्षी रक्तदान शिबिराचे आयोजन करून शिवजयंती साजरी करण्यात आली.
बापूसाहेब घोरपडे युवा मंच साकत यांचे वतीने कोरोनाच्या पार्श्वभूमीवर पालखी सोहळा,शिवजयंती मिरवणूक,गुणवंताचा सत्कार सोहळा असे विविध कार्यक्रम रद्द करीत शनिवार 20 फेब्रुवारी रोजी शिवप्रतिमेचे पूजन व रक्तदान शिबिराचे आयोजन करून शिवजयंती साजरी करण्यातआली. शिवप्रतिमेचे पूजन राजेंद्र चव्हाण यांचे हस्ते करण्यात आले.तर रक्तदान शिबिराचे उदघाटन सेवानिवृत्त केंद्रप्रमुख वसुदेव मोरे यांच्या हस्ते करण्यात आले.रक्तदान हेच सर्वश्रेष्ठ दान समजून ७५ रक्तदात्यांनी रक्तदान करून एकप्रकारे सामाजिक बांधिलकी जोपासली.राज्यात कोरोना विषाणूचा संसर्ग हळूहळू वाढू लागला आहे.रूग्णांना रक्ताचा तुटवडा भासू नये म्हणून साकत येथील युवकांनी शिवजयंतीचे औचित्य साधत रक्तदान शिबिराचे आयोजन केले त्यास उस्फूर्त प्रतिसाद मिळाला.यावेळी बापूसाहेब घोरपडे युवा मंच साकतचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Share Now

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *