काळेगावात कोरोनाच्या पार्श्वभूमीवर 66 जणांचे रक्तदान


वैराग (प्रतिनिधी )राज्यात दिवसेंदिवस कोरोनाचा कहर वाढत असून रुग्णांना रक्ताचा तुटवटा जाणवत आहे.त्यामुळे शासन,प्रशासन व ब्लड बँक यांचेकडून नागरिकांना पुढे येऊन रक्तदान करण्याचे अवाहन केले जात आहे. याच अवाहनाला प्रतिसाद देत काळेगाव(ता.बार्शी) ग्रामस्थ व श्रीमान रामभाई शहा रक्तपेढी,बार्शी यांचे सयूंक्त विद्यमाने रक्तदान शिबिर घेण्यात आले .

शिबिराचे उदघाटन सरपंच – आप्पासाहेब घायतिडक यांच्या हस्ते करण्यात आले.रक्तदान शिबिरात 66 रक्तदात्यांनी रक्तदान हेच श्रेष्ठ दान समजून सामाजिक बांधिलकी जोपासली.
राज्यात एक मे पासून अठरा वर्षांपूढील युवकांना कोरोना प्रतिबंधक लस घेण्यास शासनाने परवानगी दिली आहे.लस घेतल्यानंतर पुढील दोन महिने रक्तदान करता येणार नाही त्यामुळे रक्ताचा तुटवडा जाणवू नये म्हणून सदर रक्तदान शिबिराचे आयोजन केले असल्याचे सरपंच आप्पासाहेब घायतिडक यांनी सांगितले.
यावेळी रक्तपेढीचे अनुराधा डोंगरे,सुप्रिया लगदिवे,गणेश मांजरे,ताज सय्यद,विशाल झोरी,चंद्रकांत गायकवाड,विशाल घोळवे,पांडुरंग राऊत,माजी सरपंच अशोक घायतिडक,पोलीस पाटील आण्णासाहेब घायतिडक,पंडित गटकळ,प्रा.सोमनाथ पाटील,
दादासाहेब घायतिडक,विजय घायतिडक व काळेगाव ग्रामस्थ उपस्थित होते.

Share Now

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *