बाळराजे जाधव यांच्या वाढदिवसानिमित्त जामगावात रक्तदान शिबिर

बार्शी (प्रतिनिधी)आशा पुर्वक जगदंबा देवस्थान ट्रस्टचे संस्थापक अध्यक्ष, ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते बाळराजे जाधव यांच्या वाढदिवसानिमित्त जामगांव (आ.)ताबार्शी येथे शुक्रवार २३ एप्रिल रोजी रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमाच्या सुरुवातीला छत्रपती शिवाजी महाराज व आई जगदंबेच्या प्रतिमेचे पूजन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.
कोरोना महामारीच्या नियम व अटींचे पालन करत ही रक्तदान शिबिर पार पडले. बाळराजे जाधव यांनी आतापर्यंत सामाजिक कार्यामध्ये खूप मोठे योगदान केले आहे. गेल्या 21 वर्षांपासून आपल्या वाढदिवसानिमित्त आशा पूर्वक जगदंबा देवस्थान व बाळराजे युवा मंच यांच्या वतीने दरवर्षी रक्तदान शिबिराचे आयोजन केले जाते . या माध्यमातून समाजातील गरजू व गरीब व्यक्तींना मोफत रक्त पुरवठा उपलब्ध होतो आहे . बार्शी येथील भगवंत ब्लड बँक व कुर्डूवाडी येथील ब्लड बँकेच्या सहकार्याने यावेळी रक्त संकलन करण्यात आले. जामगाव येथील युवकांनी रक्तदान शिबिरास मोठा प्रतिसाद देत सहभाग नोंदवला.


प्रत्येक रक्तदात्यांना बाळराजे युवा मंचच्या वतीने भेट वस्तू व प्रमाणपत्र देऊन सन्मानित करण्यात आले. याप्रसंगी जामगाव येथील सरपंच, उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्य ,आशा पूर्वक जगदंबा देवस्थान कमिटीचे सर्व सदस्य, बाळराजे युवा मंचचे सदस्य व गावातील युवक उपस्थित होते.

Share Now

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *