मुंगशी येथे रक्तदान शिबिर संपन्न

मुंगशी प्रतिनिधी( काशीनाथ क्षीरसागर )
मुंगशी तालुका बार्शी येथे छत्रपती शिवाजी महाराज जयंती निमित्त तसेच ग्रामदैवत श्री संत सोनार महाराज यांच्या पुण्यतिथीनिमित्त रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते .

“क्रांतिचे ढोल नवे, त्यासी चर्म तुझे हवे, वांझोटे शब्द नको, रक्ताचे दान हवे “या उक्तीप्रमाने गावातील तरुणांनी या रक्तदान शिबिरास उत्स्फूर्तपणे प्रतिसाद दिला यामध्ये सुमारे ६३ जणांनी सहभाग नोंदवला . बार्शी येथील भगवंत ब्लड बँकेचे चेअरमन शशीकांत जगदाळे व त्यांच्या टीमचेे सहकार्य लाभले या कार्यक्रमावेळी स्नेहल क्षीरसागर ,ऋषिकेश भोसले ,रत्नजीत क्षीरसागर सेनापती क्षीरसागर, सागर क्षीरसागर ,अमित क्षीरसागर संतोष कोरे , शाम खंबे , गणेश पासले ,महाविर क्षीरसागर, झानेश्वर क्षीरसागर,लक्ष्मण क्षीरसागर, वसंत क्षीरसागर, गणपत क्षीरसागर,सुहास क्षीरसागर, राजाभाऊ उकरंडे, महादेव वळसे, बंटी पाटील, विशाल क्षीरसागर, रोहन क्षीरसागर, महादेव शेरखाने, बबलू राऊत, प्रवीण क्षीरसागर, गणेश क्षीरसागर, आदींनी परिश्रम घेतले ग्रामस्थांनी दिलेल्या उत्स्फूर्त प्रतिसादाबद्दल भगवंत ब्लड बँक बार्शीचेे चेअरमन शशीकांत जगदाळे यांनी शिवजन्मोत्सव कमिटी तसेच सर्व रक्तदात्यांचे आभार मानले.

Share Now

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *