पंढरपूर पोटनिवडणुकीत भाजपचे समाधान आवताडे विजयी

पंढरपूर(प्रतिनिधी )पंढरपूर पोटनिवडणुकीत भाजप व राष्ट्रवादी असा काट्याचा सामना झाला. यामध्ये भाजपचे समाधान आवताडे यांनी ३७३३ मतांची आघाडी घेत विजय मिळवला.
मत मोजणीच्या वेळी सुरुवातीच्या फेऱ्यात राष्ट्रवादी काँग्रेसचे भगीरथ भालके यांनी आघाडी घेतली होती. त्यानंतर पंढरपूर शहराचे मतदान सुरू झाल्यानंतर अवताडे यांनी मतांची आघाडी शेवटपर्यंत कायम ठेवली. पंढरपूर शहर आणि तालुक्यामध्ये एक हजार बावीस मतांची आघाडी घेत त्यांनी मंगळवेढात प्रवेश केला. मंगळवेढा शहरात अवताडे यांना चांगले मताधिक्य मिळाले. तर मंगळवेढ्यातील ग्रामीण भागात अवताडे आणि भालके असा काट्याचा सामना रंगला. सरतेशेवटी अवताडे यांनी पोस्टल मतांमध्ये देखील आपली आघाडी कायम ठेवली आणि राष्ट्रवादीचे भगीरथ भारत भालके यांचा पराभव केला.

मंगळवेढ्याची मतमोजणी 20 ते 38 या फेरींमध्ये झाली. हा भाग आवताडेंचा बालेकिल्ला म्हणुन ओळखला जातो. त्यामुळे 19 व्या फेरीनंतरच भाजप कार्यकर्त्यांमध्ये आनंदाचं वातावरण पाहायला मिळत होतं. आवताडे यांच्या विजयानंतर राष्ट्रवादीला मोठा धक्का बसला आहे. पंढरपूर तालुक्यात भारत भालके यांना मागच्या निवडणुकीत 6000 मतांची आघाडी मिळाली होती. पण भारतनानांचे सुपुत्र भगीरथ यांना नागरिकांनी तो प्रतिसाद दिला नसल्याचं पाहायला मिळाले.


पंढरपुरात भाजपाने आमदार प्रशांत परिचारक यांनी मोठी ताकद समाधान आवताडे यांच्या पाठीमागे उभी केली होती. परिणामी या ताकतीचा उपयोग अवताडे यांच्या विजयात असल्याचे दिसून येत आहे.पंढरपूर पोटनिवडणुकीत भाजप व राष्ट्रवादी असा काट्याचा सामना झाला. यामध्ये भाजपचे समाधान आवताडे यांनी ३७३३ मतांची आघाडी घेत विजय मिळवला.

Share Now

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *