इर्लेवाडी ग्रामस्थांतर्फे सेवापूर्ती निमित्त भुमीपुत्रांचा सत्कार

आदर्श शिक्षक अंगद  सरकाळे ,हरिदास  मेरड , बस चालक – राजेंद्र  मेरड यांचा सत्कार करण्यात आला

बार्शी तालुक्यातील इर्लेवाडी येथे
शिक्षणक्षेत्रात व एसटी महामंडळात अगदी आत्मीयतेने व प्रामाणिकपणाने सेवा पूर्ण करणाऱ्या त्रिरत्नाचा सत्कार आयोजित करण्यात आला होता.रायगड जिल्ह्यात ३३ वर्षे ज्ञानदानाचे पवित्र काम करणारे आदर्श शिक्षक अंगद माणिकराव सरकाळे (विषय-गणित),मालवंडी हायस्कुल येथे ३३ वर्षे सेवापूर्ती केलेले आदर्श शिक्षक हरिदास कडीभान मेरड(विषय-इंग्रजी) व बार्शी एसटी डेपोत २० वर्षे जनतेची सेवा करणारे राजेंद्र कडीभान मेरड यांचा सेवपूर्तीनिमित्त विविध क्षेत्रातील मान्यवरांच्या हस्ते सपत्निक सन्मान करण्यात आला.

यावेळी बिभिषण सरकाळे,आनंद गवळी,नागनाथ काकडे,वनराज गायकवाड यांनी मनोगत व्यक्त केले.सत्काराला उत्तर देताना अंगद सरकाळे म्हणाले इर्लेवाडी ग्रामस्थांनी, नातेवाईकांनी,मित्रपरिवाराने केलेला सन्मान हा शिक्षण क्षेत्रात दिलेल्या योगदानाची पोच पावती आहे.आम्हा सर्वांचा केलेला सन्मान हा भविष्यात कुटूंबासाठी,गावासाठी समाजासाठी उत्तमोत्तम कार्य करण्यासाठी प्रेरणादायी ठरेल असे मत सेवानिवृत्त शिक्षक अंगद सरकाळे यांनी व्यक्त केले.यावेळी मधुकर गायकवाड,बीभिषण सरकाळे,दत्तात्रय पाटील,नागनाथ काकडे,बाजीराव तांबारे,नारायण गायकवाड,पांडुरंग मोहिते,प्रभू चिखले,भालचंद्र सरकाळे,आंनद गवळी,प्राथमिक शिक्षक धनराज गायकवाड,वनराज गायकवाड,इर्लेचे उपसरपंच प्रकाश देवकते,बब्रुवान चव्हाण,अमोल सरकाळे,शरद सरकाळे,पिएसआय प्रमोद मेरड,अजित चव्हाण,सुजित काकडे,संजय मेरड,किरण सरकाळे उपस्थित होते.सूत्रसंचालन व आभार प्रा स्नेहल सरकाळे यांनी मानले.

Share Now

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *