भोसले साहेबांच्या ‘ रोपळे विकास पॅटर्न ‘ ने दिला गावकऱ्यांना मदतीचा हात…

रोपळे( दादासाहेब कदम )आतापर्यंत समाजाने आपल्याला खूप काही दिले , त्याची उतराई म्हणून आत्ता आपणही गावासाठी काहीतरी करून दाखवायच हि जिद्द मनात ठेवून सामाजिक कार्यास सुरूवात करून रोपळे विकासाचा नवा पॅटर्न शिवाजी भोसले यांंनी उभा केला . ते भूमिअभिलेख खात्यात मोठ्या पदावर असूनही कोणताच गर्व न बाळगता गावातील विविध घटकांसाठी नेहमीच मदतीचा हात पुढे करतात . रोपळे गावच्या सर्वांगीण विकासास हातभार लावणारे जिगरबाज अधिकारी तथा विकासपुत्र म्हणून त्यांची ओळख आहे.

  • कोरोनाच्या काळातही मदतीचा हात …..
    कोरोनाच्या काळातही गोरगरिबांना आधार देण्याचे कार्य शिवाजी भोसले साहेबांनी केले आहे. पंढरपूर तालुक्यातील रोपळे या जन्मभूमी व कर्मभूमीचा भौतिक, सामाजिक, शैक्षणिक विकास व्हावा हा त्यांचा मानस आहे. त्यादृष्टीने विकास प्रतिष्ठान स्थापन करून विविध विकास कामे यशस्वीरीत्या केली .
    * गावासाठी विविध विकास कामे ….
    यामध्ये येथील ग्रामस्वच्छता अभियानात शौचालय उभारणीसाठी अनेक गरीब कुटुंबांना शौचालय उभारण्यासाठी पाठबळ देऊन मदत तर केलीच त्याचबरोबर या अभियानाची जनजागृती करून चळवळसुद्धा उभारली. त्यामुळे गावच्या स्वच्छतेला उल्लेखनीय हातभर मिळाला.
    *गावच्या शैक्षणिक प्रगतीचा आलेख उंचावण्यास मदत
    गावच्या विकासासाठी त्या गावातील शैक्षणिक क्षेत्र विकसित असावे लागते. त्यासाठी भोसले यांनी पुढाकार घेऊन येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील वर्गखोल्यांसाठी सुमारे पंधरा लाख रुपये निधी मिळून नूतनीकरण केले. शाळेसाठी रंग काम करून संरक्षण भिंत उभारली, विद्यार्थी संगणक साक्षर व्हावा म्हणून संगणक व प्रोजेक्टर देऊन वर्गखोल्या डिजिटल करण्याची जबाबदारी पार पडली. यातून शाळेचा भौतिक विकास झालाच परंतु गुणवत्तावाढीसाठी मदतच झाली.
    तसेच येथील श्री शिवाजीभाऊ बाबा पाटील विद्यालयासाठी दीड लाखाचा शुद्ध पिण्याच्या पाण्याचा आरो फिल्टर बसविला, विद्यार्थ्यांना बसण्यासाठी सुमारे 50 बँच, विद्यार्थ्यांसाठी सुमारे 50 हजार रुपयेची स्पर्धा परीक्षा पुस्तके, तसेच संगणक संच भेट देऊन याही शाळेच्या विकासामध्ये भर टाकली.
गावातील तरुणांसाठी भव्य क्रिडांगण  करण्याचे काम सुरु आहे. त्याची पाहणी करताना

*जलसंधारणासाठी शेतकऱ्यांना मदत …
गावातील शेतकऱ्यांना जलसंधारणाचे महत्त्व पटवून देऊन जलसंधारणाच्या कामामध्ये सहभाग नोंदवत आष्टी तलावामधील गाळ शेतकऱ्यांच्या शेतामध्ये टाकण्यासाठी सहकार्य केले.
*पाण्यासाठी स्वखर्चाने बोअर पाडली. . . .
गावातील नागरिकांनी पिण्याच्या पाण्याची समस्या व्यक्त केली असता एक बोअर ही स्वखर्चाने पाडून दिली.तर गावातील तरुणाईसाठी भव्य क्रिडांगण तयार करण्याचे काम सुरु आहे.
*कोणत्याही कठीण काळात मदतीला धावणारा अधिकारी
रोपळे व परिसरातील सामान्य जनतेचे असणारे प्रश्न सोडविण्यासाठी नेहमी प्रयत्नशिल . यामध्ये गोरगरिबांच्या लग्नासाठी, शिक्षणासाठी, दवाखान्यासाठी मदत करण्याची भूमिका बजावली. तर कोरोनच्या काळामध्ये गावातील गरजूंना धान्य वाटप करून कठीण परिस्थितीमध्ये त्यांना आधार दिला.

गावकऱ्यांच्या पिण्याच्या पाण्याची समस्या  स्वखर्चाने बोअर पाडून सोडवली .

तसेच या कालावधीत शासनाकडून दिलेली अतिरिक्त जबाबदारी म्हणजे पुणे येथे पुरवठा समन्वयक कार्य करताना तेथील अनेक गरजूंना आधार देण्याची कार्य केले.
भूमापन क्षेत्रामध्ये नोकरीस असल्याने कामाच्या ठिकाणी अनेक सामाजिक उपक्रम राबवले या उपक्रमांची दखल घेऊन शासनाने त्यांचा वेळोवेळी सन्मानही केला आहे .

कोरोना कालावधी पूर्वी व कोरोना कालावधीत गरजू लोकांसाठी सामाजिक कार्य केले असून पुढील कालावधीत ही सर्वांच्या सहकार्याने समाजाच्या व गावातील नागरिकांच्या समस्या सोडविण्यासाठी तत्पर राहणार आहे.
शिवाजी भोसले, रोपळे ता.पंढरपूर
उपसंचालक, भूमिअभिलेख पुणे

Share Now

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *