वैराग येथे वंचित आघाडी व सिद्धार्थ मंडळातर्फे मिठाई वाटून भिमजयंती साजरी

वैराग (प्रतिनिधी ) वंचित बहुजन आघाडी व सिध्दार्थ तरुण मंडळ वैराग यांचे वतीने डाँ बाबासाहेब आंबेडकर यांच्या 130 व्या जयंतीनिमित्त छत्रपती शिवाजी महाराज चौकात डाँ बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन करून त्यांना अभिवादन करण्यात आले .

या वेळी वंचित बहुजन आघाडी यांचे वतीने वैराग व परिसरातील नागरिकांना लाडु व इतर मिठाईचे पदार्थ देण्यात आले .कोरना प्रतिबंधक सर्व नियम पाळून हा कार्यक्रम आयोजित केला होता .

या कार्यक्रमासाठी वंचित बहुजन आघाडी चे सुरज वाघमारे, अरविंद माने, राजकुमार कसबे, अमोल वाघमारे ,विजय वाघमारे, नाना क्षीरसागर, सचिन नेटके, अमोल ठोंबरे, शुभम वाघमारे, संतोष भालशंकर, विशाल भालशंकर, संतोष लंकेशवर, सोमनाथ कसबे, अनिल सकट ,रमेश शिंदे, पेंडी भालशंकर आदी उपस्थित होते

Share Now

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *