बार्शीत सपोनी – जायपत्रे यांचा कोरोना चाचणी व दंडात्मक कारवाईचा अनोखा उपक्रम…

बार्शी | प्रतिनिधी

बार्शी तालुका ग्रामीण पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस शिवाजी जायपत्रे यांनी कोरोना महामारीला आळा बसण्यासाठी हाती घेतला एक वेगळा उपक्रम .
बार्शी कुर्डवाडी हायवेवर अलीपूर हद्दीतील बायपास चौकामध्ये नाकाबंदी करून येणारी-जाणारी सर्व वाहतूक व प्रवासी आडवून, बार्शीचे वैद्यकीय अधिकारी यांच्या सहकार्याने वैद्यकीय कर्मचाऱ्यांची टीम सोबत घेऊन, नागरिकांची त्याच ठिकाणी कोरणा चाचणी केली जात आहे. त्याचबरोबर विना मास्क व विनाकारण फिरणाऱ्या नागरिकांवर दंडात्मक कारवाई केली जात आहे. यावेळी स. पो. नि. शिवाजी जयपत्रे व बार्शी ग्रामीण पोलिस स्टेशनचे अधिकारी व कर्मचारी या मोहिमेमध्ये सहभागी झाले होते. स. पो. नि. शिवाजी जयपत्रे यांनी नागरिकांना बाहेर न पाडण्याचे आवाहन देखील यावेळी केले आहे . या उपक्रमामुळे त्याचे सर्व स्तरातून कौतुक केले जात आहे.

Share Now

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *