बार्शी तालुक्यात अतिवृष्टीने नुकसान झालेल्या शेतकर्‍यांना तातडीने भरपाई दया – राजेंद्र मिरगणे

तडवळे येथील बंधाऱ्याचा भराव वाहून गेल्याने नुकसानीची पाहणी करताना राजेंद्र मिरगणे , सोबत पदाधिकारी , व ग्रामस्थ .

वैराग (प्रतिनिधी ) वैराग व बार्शी भागात झालेल्या अतिवृष्टि मुळे अनेक पाझर तलाव , सिमेंट बंधारे , कॅनाल फुटले त्यामुळे नैसगिक आपत्ती बरोबर ,शासकिय तांत्रिक आपत्ती चा जबरदस्त फटका शेतक ऱ्यांना बसला असून हजारो हेक्टर सुपिक माती वाहून गेली आहे . घरांची पडझड, पिक नुकसान व इतर सर्व नुकसानीच्या पंचनाम्या बरोबरच सुपीक मातीच्या नुकसानीचेही प्रशासनाने पंचनामे करावेत अशी मागणी महाहौसिंगचे माजी सहअध्यक्ष – राजेंद्र मिरगणे यांनी केली आहे .

आपत्ती ग्रस्तांना मदतीचा धनादेश देताना राजेंद्र मिरगणे व घोडके व ताटे कुटूंबिय ,पदाधिकारी , ग्रामस्थ
वैराग व भागातील अतिवृष्टीने नुकसान झालेल्या शेतकर्‍यांच्या भेटी व नुकसानीची पाहणी करणेसाठी रविवारी ते आले असता त्यांनी बोलताना सांगीतले .
तालुक्यातील पानगाव वैराग , पिंपरी, काळेगाव, मुंगशी, तडवळे, घाणेगाव, रातंजन, मालेगाव आदी गावात जावून मिरगणे यांनी
अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या शेतकर्‍यांना भेटून नुकसानीची पाहणी केली .
बार्शीच्या तहसिलदारांनी वरीष्ठांच्या आदेशानुसार तालुक्यातील जे – जे नुकसान झाले त्या सर्वाचे पंचनामे तात्काळ करावेत .
अति वृष्टि नंतर ४ -५ दिवस उलटले तरी बार्शी तालुक्यात एकाही गावात पंचनामे झाले नव्हते . प्रशासनातील वरिष्ठ अधिकाऱ्यांना घटनेचे गांभीर्य पटवून देत वारंवार विनंती केली असता रविवारी दुपारनंतर पंचनामे सुरु झालेचे
मिरगणे यांनी यावेळी सांगितले .
बार्शी तालुक्यात अतिवृष्टिने ६ पाझर तलाव , हिंगणी व जवळगाव प्रकल्पाचे काही कालवे फुटले आहेत , १७ सिमेंट बंधारे फुटले. यामध्ये नैसर्गिक आपत्ती बरोबरच प्रशासनाच्या तांत्रिक चुकामुळे वरील नुकसान झाले आहे . त्यामुळे शासकिय यंत्रणेचा भुर्दड शेतकऱ्यांनी का घ्यावा असा सवाल करून त्यांनी शेतकऱ्यांना शासनाने नुकसान भरपाईची देण्याची मागणी प्रशासनाला केली .
भोगावती, नागझरी नदीकाठावरच्या गावातील शेतकऱ्यांच्या शेतीमध्येही पुराच्या पाण्याने काळ्या मातीसह पिके वाहून गेली . तसेच घाणेगाव भागात ३०-४० एकर सुपिक क्षेत्र वाहून गेले. अनेेक द्राक्षे बागा जमिनदोस्त झाल्या आहेत .
मुंगशी (वा ) येथिल रंगनाथ ताटे व बार्शीतील अजय अर्जुन चौगुले हे पुराच्या पाण्यात वाहून गेल्याने अद्याप बेपत्ता असून त्यांचा प्रशासनाचे त्वरीत शोध घ्यावा .
कृषि विभाग ,एरिगेशन , महावितरण , महसूल , बिडीओ , तहसिलदार यांनी वस्तुस्थिती पाहून तलाठी , ग्रामसेवक , कृषि सहाय्यक यांना नुकसान झालेल्या सर्व घटकांचे पंचनामे करण्याचे आदेश द्यावेत अशाही मागणी केली आहे .
नुकसानग्रस्त भागातील भेटीच्या वेळी राजेंद्र मिरगणे यांचे सोबत कॉंग्रेसचे -जीवनदत्त आरगडे, राजेंद्र गायकवाड, बाजार समितीचे संचालक – साहेबराव देशमुख, कुणाल घोलप, राजाभाऊ काकडे, बाळासाहेब पवार, आनंद काशिद, अविनाश शिंदे, शिरीष घळके, रामेश्वर स्वामी, संदिप घोडके, किरण जाधव, संभाजी आगलावे, बापू लोखंडे, हिरालाल शेख, सचिन घोडके, शशांक शिराळ, रविंद्र सांगोळे आदी
उपस्थित होते.


मालेगाव येथिल आपत्तीग्रस्त मयत घोडके व मुंगशी (वा ) येथिल बेपत्ता रंगनाथ ताटे यांच्या कुटुंबियांना प्रत्येकी 25 हजारांची मदत मिरगणे यांनी केली .

Share Now

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *