बार्शीच्या तहसीलदार पदी शेरखाने यांची नियुक्ती


बार्शी ( प्रतिनिधी)
बार्शीचे तहसीलदार प्रदीप शेलार यांच्या बदलीने रिक्त होणाऱ्या जागी आष्टा जि . सांगली येथील अप्पर तहसीलदार – सुनील शेरखाने यांची बार्शी तहसीलदार पदी नियुक्ती झाल्याचा आदेश निघाला आहे.

सुनील शेरखाने हे मुळचे बार्शी तालुक्यातील राळेरास गावचे सुपुत्र आहेत . बार्शी तालुक्याच्या तहसीलदार पदी नियुक्ती झाल्यानंतर तालुक्यातील तहसीलदार लाभल्याने त्यांचे अभिनंदन होत आहे .
महाराष्ट्र शासनाच्या महसूल व वन विभागातील १ आक्टोंबरच्या बदली संदर्भातील आदेशान्वये झालेल्या बदल्या मध्ये बार्शीचे तहसीलदार प्रदीप शेलार यांची कडा तहसील येथे बदली झाली आहे .त्यामुळे त्यांच्या रिक्त जागेवर सुनिल शेरखाने यांचा नियुक्ती आदेश निघाला आहे.

Share Now

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *