ज्योति राजेंद्र सरवदे यांना ‘राष्ट्रीय अहिल्या रत्न पुरस्कार ‘ प्रदान

नाशिक :पुण्यश्लोक अहिल्यादेवींचे वंशज भूषणसिंहराजे होळकर यांच्या हस्ते ‘ राष्ट्रीय अहिल्यारत्न पुरस्कार ‘ स्विकारताना ज्योति राजेंद्र सरवदे . यावेळी व्यासपीठावर उपस्थित अन्य मान्यवर .

वैराग, ता .११ : जागतिक महिला दिनाच्या औचित्यावर मालवंडी ( ता.बार्शी ) येथील अक्षरवेल – ज्योति फाऊंडेशनच्या संस्थापिका ज्योति राजेंद्र सरवदे यांना नाशिक येथील साई बहुद्देशिय संस्थेतर्फे दिला जाणारा यावर्षीचा ‘ राष्ट्रीयअहिल्यारत्न पुरस्कार ‘ पुण्यश्लोक अहिल्यादेवींचे वंशज भूषणसिंहराजे होळकर यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला .
शाल, श्रीफळ, सन्मानचिन्ह व प्रशस्तीपत्रक असे या पुरस्काराचे स्वरूप आहे . अक्षरवेल ज्योति फाऊंडेशनच्या माध्यमातून ज्योति सरवदे यांचे सामाजिक, कला, क्रीडा, साहित्य क्षेत्रात उल्लेखनिय सुरु आहे . या फाऊंडेशनच्या माध्यमातून त्यांनी अनेक विधवा, निराधार , विस्थापित महिलांचे प्रश्न सोडवून त्यांना प्रबोधन करणे व गरजूंना आधार देण्याचे कार्य केले जात असून या फाऊंडेशनच्या महिला व विराग मधुमती यांच्यातर्फे सलग १हजार तास गीते गाण्याचा विश्वविक्रम ‘ गिनीज बुकात ‘ नोंदवला आहे . खारघर , नवी- मुंबई येथून त्यांनी या फाऊंडेशनचा प्रारंभ केला . आता या फाऊंडेशनचे राज्यभर नेटवर्क सुरू आहे .
हा पुरस्कार वितरण सोहळा कोरोणाच्या पार्श्वभूमिवर मोजक्या लोकांच्या उपस्थितीत घेण्यात आला . यावेळी व्यासपीठावर डॉ शेफालीताई भुजबळ, इंडिया दर्पनचे साहित्य व संस्कृति विभागाचे संपादक देविदास चौधरी, अभिनेत्री स्मिता प्रभू, डॉ प्रशांत देवरे, संगीता पाटील,संजिवनी थोरात आदी उपस्थीत होते .

Share Now

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *