बार्शीच्या डॉ.जगदीश झाडबुकेंच्या शिरपेचात आणखी एक तुरा…


बार्शी | प्रतिनिधी
महाराष्ट्राच्या क्रीडा चळवळीत व शारीरिक शिक्षण क्षेत्रात विशेष नाव असलेले बार्शीचे सुपुत्र डॉ.जगदीश झाडबुके यांची सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या शारीरिक शिक्षण, क्रीडा व स्पर्धा अभ्यास मंडळावर निवड झाली आहे. या निवडीने त्यांच्या शिरपेचात आणखी एक तुरा खोवला आहे .


डॉ.जगदीश झाडबुके सध्या बार्शीच्या श्रीमान भाऊसाहेब झाडबुके महाविद्यालयात कार्यरत आहेत .गेली चाळीस वर्ष ते क्रीडा आणि शारीरिक शिक्षण विकास चळवळीत सक्रीय आहेत.त्यांनी केलेले संशोधन क्रीडा क्षेत्राला नवी दिशा देणारे ठरलेले आहे. तसेच त्यांनी लिहिलेली पुस्तकेही उल्लेखनीय ठरली आहेत. आंतरराष्ट्रीय, राष्ट्रीय आणि विद्यापीठ पातळीवरील क्रीडा स्पर्धांच्या नियोजन-आयोजनात नेहमीच ते पुढे राहिले आहेत. त्यामुळे त्यांच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा खोवला गेला आहे . डॉ. झाडबुके यांचे पुणे विद्यापीठाच्या अभ्यास मंडळावरील निवडीने झाडबुके महाविद्यालय , व मित्र -मंडळी कडून अभिनंदन होत आहे .

Share Now

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *