अनगरच्या लोकनेते साखर कारखान्यात गॅसची टाकी पडून दोघांचा मृत्यू ; आठ जखमी.


मोहोळ (प्रतिनिधी )
  अनगर ता.मोहोळ येथील लोकनेते साखर कारखान्यातील बायोगॅसची टाकी अचानक खाली कोसळून झालेल्या दुर्घटनेत गुदमरून दोघांचा जागीच मृत्यू झाला तर अन्य आठजण जखमी झाले . ही घटना २१ रोजी शनिवारी रात्री १२.३० च्या सुमारास कारखान्याच्या आसवनी विभागात घडली .

यामध्ये ज्योतिराम दादा वगरे ( वय ४५ ) , सुरेश अंकुश चव्हाण ( वय २२, दोघेही रा. बिटले ) अशी मृतांची नावे आहेत . तर सज्जन बाळू जोगदंड ( रा . बिटले ) , मंगेश नामदेव पाचपुंड ( रा . अनगर ) , महेश दिलीप बोडके ( रा . अनगर ) , कल्याण किसन गुंड ( रा . बिटले ) , परमेश्वर मधुकर थिटे ( रा . नालबंदवाडी ) , राजू दत्तात्रय गायकवाड ( रा . कुरणवाडी ) , रवींद्र गजेंद्र काकडे ( रा . अनगर ) , संजय बाजीराव पाचे ( रा . अनगर ) जखमीं आहेत . जखमींना सोलापूर येथील खासगी रुग्णालयात उपचार सुरू असून त्यांची प्रकृती स्थिर आहे .
शनिवारी रात्री १२ :३० वाजता आसवनी विभागातील बायोगॅस डायजेस्ट गॅस टाकी अचानक खाली कोसळली , त्यामुळे त्यातून मिथेन गॅस व द्रवरूप वायू बाहेर पडून त्यात गुदमरून दोघांचा जागीच मृत्यू झाला , तर अन्य आठ जण जखमी झाले . या दुर्घटनेची माहिती मिळताच सहाय्यक पोलिस निरीक्षक संतोष इंगळे व त्यांच्या सहकाऱ्यांनी घटनास्थळाला भेट देऊन पाहणी केली . पोलिस निरीक्षक अशोक सायकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक संतोष इंगळे तपास करीत आहेत .

Share Now

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *