आंबेडकर विधी मंच, सोलापूरच्या वतीने हाथरस घटनेतील दोषीवर कारवाईची मागणी


सोलापूर (प्रतिनिधी )
उत्तरप्रदेशातील हाथरस येथे नुकताच माणूसकीला काळीमा फासणारा प्रकार घडला . वाल्मिकी समाजाच्या भगिनीवर अत्याचार करुन, तिला ठार केले . या घटनेचा आंबेडकर विधी मंच, सोलापूरच्या वतीने बुधवारी ७ आक्टोंबर रोजी तीव्र निषेध करून दोषींवर कठोर कायदेशीर कारवाई करण्याच्या मागणीचे निवेदन जिल्हाधिकारी यांना देण्यात आले .

उत्तरप्रदेशातील हाथरस येथे दलित समाजातील भगिनीवर अत्याचार करुन, तिला ठार केले . याउलट दोषींवर कारवाई होण्याऐवजी तिचा मृतदेह तेथील प्रशासनाने घाईगडबडीत पेट्रोल टाकुन रात्रीतच जाळून टाकला. तसेच संवेदनशिल प्रकरणामध्ये फिर्यादी व तिच्या कुटुंबियांना संरक्षण न देता, उलट त्यांचे दमन करुन, त्यांचे उपचर प्रश्नचिन्ह निर्माण करण्यात आले, हा सर्व निंदनीय प्रकार असल्याने व लोकशाहीवर हल्ला करणारा असल्याने, डॉ. बाबासाहेब आंबेडकर विधी मंच, सोलापूर च्या वतीने या सर्व प्रकारचा अत्यंत तिव्र शब्दात निषेध व्यक्त केला आहे.
या सर्व निंदनीय प्रकाराबाबत आम्हा सदस्यांच्या भावना अत्यंत तिव्र असून, या जोगे सर्व बहुजन वकिल बांधवामध्ये याविषयी असंतोष निर्माण झालेला आहे. तरी आमच्या भावनाची शासन दरबारी दखल घ्यावी, अशा संवेदनशील प्रकरणामध्ये दोषींवर कठोर कायदेशीर कारवाई होऊन बळी पडलेल्यांना तत्काळ संरक्षण मिळून त्यांना योग्य ती नुकसान भरपाई देखील मिळावी तसेच निवेदनातील मागण्या पूर्ण न झाल्यास विधी मंच, मोठे जनजांदोलन उभे करेल. निवेदनात म्हटले आहे .
यावेळी विधी मंचचे अध्यक्ष – अॅड . अजय रणशृंगारे , अँड.अनिरुद्ध सोनवणे अॅड . संजीव सदाफुले , अॅड . प्रेमनाथ सोनवणे , अॅड . सरवदे ,अॅड . गायकवाड आदी विधीज्ञ उपस्थित होते .

Share Now

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *