माध्यमांमध्ये जरी तांत्रिक बदल झाले तरी पत्रकारितेचा मुळ गाभा जुनाच – राजा माने

वैराग (प्रतिनिधी ) माध्यम क्षेत्र सध्या बदलाच्या नव्या वळणावर उभे आहे भविष्यात यामध्ये काय बदल होतील हे कोणालाही निश्चितपणे सांगता येणार नाहीत. या पार्श्वभूमिवर ग्रामीण पत्रकारांनी या नाविन्यपूर्ण बदलाचा स्वीकार करीत समाजाबरोबरच कुटूंबाच्या उदरनिर्वाहाला प्राध्यान्य देत पत्रकारीता केली पाहिजे असे प्रतिपादन जेष्ठ संपादक -राजा माने यांनी केले .
बुधवार ३ मार्च रोजी कोरोना प्रतिबंधक नियमाचे पालन करित सौ.सुवर्णलता गांधी महाविद्यालय वैराग येथे जेष्ठ संपादक व . महाराष्ट्र राज्य डिजिटल संपादक-पत्रकार संघाचे संस्थापक अध्यक्ष- राजा माने साहेब यांच्या हस्ते सा .बार्शी परिवर्तनच्या ४ थ्या वर्धापन अंकाच्या प्रकाशन प्रसंगी ते बोलत होते.
यावेळी प्रकाशन कार्यकमाच्या अध्यक्षस्थानी काकासाहेब बादगुडे होते तसेच दलित मित्र व वैराग राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष प्रशांत भालशंकर ,डॉ.राजेंद्र बाजारे,डॉ.अपेक्षा गुंड प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते .


पुढे बोलताना “बदलत्या परिस्थितीनुरुप व काळानुरूप माध्यमांमध्ये तांत्रिक क्रांती घडून अनेक नवे तांत्रिक प्लॅटफॉर्म आले ,तांत्रिक बदल होत गेले परंतू पत्रकारितेचा मूळ आत्मा तोच कायम राहिला आहे . हाच आत्मा कायम ठेवण्याची जबाबदारी आता मेट्रोसिटी पासून ते गावपातळीवरच्या पत्रकाराच्या हातामध्ये आहेे .ज्याला ज्या कामासाठी – ज्या पध्दतीने माहिती मिळते ते माहिती देणारे माध्यम म्हणजे सध्याची पत्रकारिता होय “असे मत राजा माने यांनी व्यक्त केले.
याप्रसंगी प्रशांत भालशंकर,सतिश बुरगुटे, शंकर धावारे यांनी बार्शी परिवर्तन विषयी मनोगत व्यक्त करून सदिच्छा दिल्या.कार्यक्रमास दै . पुढारीचे पत्रकार – आनंदकुमार डुुुरे.सकाळाचे पत्रकार शांतीलाल काशीद,दै.दिव्यमराठीचे पत्रकार -मल्लीनाथ धारूरकर, कुतूहलचे संपादक इरशाद शेख,विजेता टाईम्सचे संपादक विजय कोरे,दै.संचारचे सुहास ढेकणे,दै.संचारचे पत्रकार आण्णासाहेब कुरुलकर,दै .एकमतचे – सतीश बुरगूटे,जनता लाईव्हचे -गणेश अडसूळ,बार्शी परिवर्तनचे प्रतिनिधी शंकर धावारे,गणेश मसाळ,विशाल पवार आदी विविध माध्यमांचे प्रतिनिधी तसेच कवि जीवन धेंडे ,कु.हर्षदा पिंपळे,संभाजी आवारे ,संजयकुमार भालेराव,नवनाथ खरात,प्रा.इंद्रजित पाटील,अनिल घोडके,अनिल गुंड,प्राअभिजित पाटील ,मुळे उपस्थित होते .
सुत्र संचालन प्रा .सुहास ढेकणे यांनी केले.प्रास्ताविकामध्ये संपादक बलभीम लोखंडे यांनी बार्शी परिवर्तन वाचकांच्या पाठबळावर यशाचा चढता आलेख गाठत असलेचे सांगून उपस्थितांचे आभार मानले .

Share Now

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *