तंबाखूमुक्त शाळा म्हणून आळजापूर ची जि .प . प्राथमिक शाळा गौडगांव केंद्रात प्रथम

वैराग (प्रतिनिधी) राष्ट्रीय तंबाखू नियंत्रण विभाग कार्यक्रमांतर्गत आरोग्य विभाग महाराष्ट्र शासनाकडून राज्यातील सर्व शैक्षणिक संस्था तंबाखूमुक्त करण्यासाठी सुधरित ९ निकषाची अंमलबजावणी करण्यात आली आहे .या अनुषंगाने बार्शी तालक्यातील गौडगांव केंद्रातील आळजापूर जि.प.प्रा. शाळा २०२१-२०२३ या शैक्षणिक वर्षात पहिली ‘तंबाखूमुक्त शाळा’ ठरली आहे.
तंबाखू मुक्त व आरोग्यसंपन्न मुलांसाठी आरोग्य विभाग महाराष्ट्र शासनाने जिल्हाधिकारी कार्यालयातर्फे सुधारीत नऊ निकषांना पत्राच्या आधारे सलाम मुंबई फाऊंडेशनच्या जिल्हा समन्वयक श्रीम. शुभांगी लाड, सारथी फाउंडेशनचे समन्वयक श्री.रामचंद्र वाघमारे, समन्वयक श्री.विवेकानंद जगदाळे (मुख्याध्यापक जि.प.शाळा.नागोबाचीवाडी) यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले.
यासाठी शाळेचे मुख्याध्यापक श्री. शौकत बागवान व नोडल शिक्षक -सूर्यकांत सरक ‘तंबाखू मुक्त शाळा’ करण्यासाठी परिश्रम घेतले .
शाळा तंबाखूमुक्त झाल्याबद्दल गट शिक्षणाधिकारी -साधना काकडे , विस्तार अधिकारी -लक्ष्मीकांत जाधव, केंद्रप्रमुख – उत्तम धोत्रे, आळजापूरच्या सरपंच सौ.मोनिकाताई घुगे, उपसरपंच श्री. बाबासाहेब वडवे,शाळा व्यवस्थापन समिती चे अध्यक्ष श्री.महादेव देव्हारे व समस्त ग्रामस्थांनी शाळेचे अभिनंदन केले.

Share Now

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *