बार्शी डिजिटल संपादक-पत्रकार संघाच्या अध्यक्षपदी -अजय पाटील , उपाध्यक्षपदी ईर्शाद शेख व बलभीम लोखंडे

बार्शी (प्रतिनिधी) महाराष्ट्र राज्य डिजिटल संपादक-पत्रकार संघाच्या बार्शी तालुक्यातील पदाधिकाऱ्यांच्या निवडीचा कार्यक्रम शहारातील मातृभूमी हॉल येथे संपन्न झाला. राज्यातील ज्येष्ठ पत्रकार आणि डिजिटल संपादक-पत्रकार संघाचे अध्यक्ष – राजा माने यांच्या हस्ते पदाधिकाऱ्यांना निवडीचे पत्र देण्यात आले. याप्रसंगी बार्शी टाइम्सचे संस्थापक आणि लोकमत डिजिटलचे उपसंपादक – मयूर गलांडे हेही उपस्थित होते.

राजा माने हे मूळ बार्शीचे पुत्र असल्याने त्यांच्या हस्ते आणि प्रमुख उपस्थितीत नवनियुक्त पदाधिकाऱ्यांना नियुक्ती पत्र देण्यात आले. यावेळी बोलताना, बार्शी ही माझी जन्मभूमी आहे. त्यामुळे, येथील पदाधिकाऱ्यांच्या निवडी करताना मला अत्यानंद होत आहे. महाराष्ट्रात संघटनेचा विस्तार मोठ्या प्रमाणात होत असून लवकरच आपण पहिले अधिवेशन भरविणार आहोत, असे माने यांनी सांगितले. तसेच, या संघटनेच्या माध्यमातून विधायक कार्याला गती देऊन सर्वसामान्यांचा आवाज बनण्याची जबाबदारी तुमच्यावर असल्याचेही ते म्हणाले. तर, बार्शी तालुका अध्यक्ष टिंकू पाटील यांनीही संघटनेच्या कार्याला गती देण्यासाठी सर्वांना सोबत घेऊन आणि आपल्या मार्गदर्शनाखाली काम करण्याचे आश्वासन दिले.
यावेळी, विनोद ननवरे यांना सोलापूर जिल्हा सहसचिव पदाची जबाबदारी देण्यात आली. तर, विजय कोरे यांना जिल्हा कार्यकारिणीच्या सदस्यपदी नियुक्त करण्यात आले आहे.

संघाच्या बार्शी तालुका अध्यक्षपदाचे नियुक्ती पत्र – अजय (टिंकू )पाटील यांना देताना जेष्ठ पत्रकार राजा माने , विजय कोरे , मयूर गलांडे , विनोद ननवरे

बार्शी तालुका डिजिटल संपादक-पत्रकार संघाच्या अध्यक्षपदी – अजय (टिंकू )पाटील, सरचिटणीसपदी – दिनेश मेटकरी, उपाध्यक्षपदी – इर्शाद शेख, ग्रामीण उपाध्यक्षपदी – बलभीम लोखंडे, सहसचिवपदी -धीरज शेळके आणि खजीनदारपदी – आमीन गोरे यांना नियुक्तीचे पत्र देण्यात आले. सर्व नवनियुक्त पदाधिकाऱ्यांचे अभिनंदन करुन त्यांना पुढील कार्यास शुभेच्छाही देण्यात आल्या.

संघाच्या बार्शी तालुका उपअध्यक्षपदाचे नियुक्ती पत्र – बलभिम लोखंडे यांना देताना अजय पाटील ,जेष्ठ पत्रकार राजा माने , विजय कोरे ,
Share Now

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *