बसपा च्या सोलापूर जिल्हा उपाध्यक्ष पदी ॲड.प्रेमनाथ सोनवणे

मोहोळ (प्रतिनिधी)बहुजन समाज पार्टीचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष ॲड. संदीप तांजणे यांच्या आदेशानुसार बहुजन समाज पार्टीच्या सोलापूर जिल्हा उपाध्यक्ष पदी ॲड. प्रेमनाथ सोनवणे यांची निवड करण्यात आली आहे

यावेळी प्रदेश सचिव – आप्पासाहेब लोकरे, जिल्हा अध्यक्ष -मिलिंद बनसोडे सर्व जिल्हा व शहर पदाधिकारी उपस्थित होते .प्रेमनाथ सोनवणे यांनी यापूर्वी मोहोळ विधानसभा अध्यक्ष , मोहोळ विधानसभा प्रभारी, जिल्हा सचिव म्हणून काम केले आहे .महानगरपालिका, पंचायत समिती, जिल्हा परिषद, विधानसभा, लोकसभा निवडणुकीत महत्वाची जबाबदारी पार पाडली आहे .
तसेच ते डॉ . बाबासाहेब आंबेडकर विधी मंचाचे सोलापूर जिल्हा उपाध्यक्ष आहेत .
बहुजन समाज पार्टीच्या सोलापूर जिल्हा उपाध्यक्ष पदी निवड झाल्याबद्दल सौंदणे ग्रामस्थांनी त्यांचा सत्कार केला आहे .

Share Now

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *