महामानव संस्थेचे कार्य कौतुकास्पद : शिवाजी जायपत्रे गुळपोळीत शिवजयंती निमित्त आधार कार्ड शिबीर संपन्न

बार्शी : तालुक्यातील गुळपोळी येथील महामानव बहुद्देशीय सामजिक संस्था व भारतीय डाक विभाग बार्शी यांच्या संयुक्त विद्यमाने कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी शासकीय नियमांचे पालन करत, गुळपोळी येथे शिवजयंती निमीत्त आधार कार्ड शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.

बार्शी तालुका पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक – शिवाजी जायपत्रे व दै . पुढारीचे पत्रकार – गणेश गोडसे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते . कार्यक्रमाचे अध्यक्ष डाक विभागाचे उपविभागीय अधिकारी -अमित देशमुख तर प्रमूख उपस्थित बार्शी पंचायत समिती सदस्य – इंद्रजित चिकणे , शिरीष चिकणे, कृष्णा चिकणे ,कैलास माळी ,अमोल नरखडे , ग्रामपंचायत सदस्य , अखिल भारतीय नाथ पंथी डवरी गोसावी महासंघाचे जिल्हा अध्यक्ष – संजय चव्हाण , माजी सरपंच -दत्तात्रय काळे तंटा मुक्त अध्यक्ष -गणेश चिकणे , ग्रामसेवक – वैभव माळकर, तलाठी – रावसाहेब देशमुख , पोलीस पाटील -बाळकृष्ण पिसे मान्यवर उपस्थित होते .
संत गाडगे बाबा जयंती निमीत्त प्रतिमेचे पूजन कृष्णा चिकणे , गणेश चिकणे ,इंद्रजित चिकणे यांच्या हस्ते करण्यात आले .
विविध मान्यवरांचे महापुरुषांचे पुस्तक ,गुलाब यावेळी पुष्प देऊन सत्कार करण्यात आला.
या शिबिरामध्ये नवीन आधार कार्ड काढणे, डिजिटल आधार कार्ड मध्ये दुरुस्ती करणे याला चांगला प्रतिसात मिळाला. पोस्ट विभागाच्या विविध योजनांची
माहिती देत आपले गाव सुकन्या ग्राम व
डिजिटल इंडिया ग्राम बनवण्यासाठी युवकांनी
प्रयत्न करण्याचे आवाहन डाक विभागाचे उपविभागीय अधिकारी – अमित देशमुख यांनी केले.

यावेळी संस्थेचे अध्यक्ष भैरवनाथ चौधरी, नितीन पाटील ,किरण खुरंगळे, गणेश लंगोटे, शिरीष चिकणे, कृष्णा चिकणे ,गुलाब शेख ,योगेश चिकणे ,प्रसाद पाटील ,बाळकृष्णा पिसे ,गणेश चिकणे, उल्हास सुतार, गणेश लंगोटे, प्रणाली प्रबंधक -माधव बारसकर, पंजाबराव कराड , दिपक काकडे, डाक आवेक्षक रविंद्र बगाडे,अजित नडगिरे, घनश्याम क्षिरसागर, लक्ष्मण काळे, प्रतिक वैद्य, ज्ञानेश्वर काळे, लक्ष्मण घेवारे, कल्याणी पाटील, परमेश्वर मचाले ,दत्तात्रय चौधरी ,लखन चौधरी ,संस्थेचे पदाधिकारी , ग्रामस्थ ,बार्शी पोस्ट ऑफिसचे कर्मचारी उपस्थित होते.

Share Now

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *