विनापरवाना छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा बसविल्याप्रकरणी वैराग पोलिसात गुन्हा दाखल

वैराग ता: बार्शी येथे शिवाजी चौकात बसविण्यात आलेला छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा

वैराग, दि. येथील बार्शी सोलापूर रोडवरील मुख्य चौकात विनापरवाना छत्रपती शिवाजी महाराजांचा अश्वारूड पुतळा बसविल्याप्रकरणी अज्ञात इसमां विरोधात वैराग पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत वैराग ग्रामपंचायतीचे ग्रामविकास अधिकारी सचिन श्रीराम शिंदे यांनी मंगळवारी अज्ञात व्यक्ती विरोधात फिर्याद दिली आहे. हा पुतळा बसविण्यात आल्याचे सोमवारी सकाळी  निदर्शनास आल्यानंतर पोलिसांनी तातडीने दखल घेवून सुरु केलेल्या चौकशीनंतर वैराग मध्ये पोलिस ठाण्यात मोठा जमाव जमून तणाव निर्माण झाला होता. पुतळा उभारणीसाठी अद्याप रितसर प्रस्तावच दाखल झाला नसल्याचे स्पष्ट झाले आहे.
वैराग ग्रामपंचायतीच्या सदस्यांची पंचवार्षिक मुदत संपुष्टात आल्यानंतर निवडणूक न झाल्यामुळे सध्या एच.ए. गायकवाड हे प्रशासक म्हणून कार्यरत आहेत. वैराग ग्रामपंचायतीने सन २०१० मध्ये मुख्य चौकात छत्रपती शिवाजी महाराजांचा अश्वारुढ पुतळा बसविण्यासाठी मोकळी असलेली जागा देण्याचा ठराव केला आहे. त्याप्रमाणे या जागेत सन २०१८ मध्ये चबुतराही बांधण्यात आला आहे. पुतळा बसविणेकामी शिवस्मारक समिती कार्यरत आहे. मात्र पुतळा बसविण्यासाठी अद्याप पर्यंत शासनाकडून तसेच ग्रामपंचायतीकडूनही परवानगी देण्यात आलेली नाही. दरम्यान सोमवारी पहाटे चौकातील चबुतर्‍यावर महाराजांचा पांढर्‍या कापड्यात अच्छादलेला अश्वारुढ पुतळा बसविण्यात आला आहे. जिल्हाधिकारी यांचा जमाव बंदी आदेशाचे उल्लंघन करीत विना परवाना पुतळा बसविला आहे. अशी फिर्याद ग्रामविकास अधिकारी सचिन शिंदे यांनी दिली आहे. त्यानुसार अज्ञात इसमांविरोधात गुन्हा दाखल झाला आहे. या घटनेचा पुढील तपास सह्ययक पोलीस निरीक्षक महारुद्र परजणे हे करीत आहेत.

पुतळा प्रकरणी संतप्त ग्रामस्थांनी शिवाजी चौकातील रस्त्यावर आंदोलन केले

Share Now

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *