बार्शी तालुक्यातील धसपिंपळगावात सापडले ३ महिन्याचे मृत अर्भक


बार्शी | प्रतिनिधी
बार्शी तालुक्यातील धसपिंपळगाव येथील एका वस्तीजवळ अनैतिक संबंधामधुन राहिलेले तिन ते चार महिने वयाचे पुरूष जातीचे अर्भक मृत स्थितीमधील आढळुन आले .

बापु वायकर रा. पिंपळगाव धस (भोळेवस्ती )ता-बार्शी यांनी याबाबत फिर्याद दिले वरून अज्ञात इसमाविरुध्द तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे .
वायकर पनवेल येथे ब्रोकरचा व्यवसाय करतात. सध्या लाॅकडावुन असल्याने ते एक महिन्यापुर्वी कुटुंबासह गावी आलेले आहेत. गावी शेती असल्याने शेताला सिंमेटचे पोल बसवुन तारेचे कंपाउंड मारण्याचे काम चालु आहे . 23 मे रवीवारी सकाळी 08.00 वा. चे सुमारास ते झोपेतुन उठुन अंघोळीसाठी गेले असता त्यांची मुलांनी सांगितले की,आपल्या शेतातील एका पोलजवळ एक लहान बाळ मयत अवस्थेत पडलेले आहे. त्यानंतर त्यांनी शेतात येवुन पाहिले असता शेताच्या पोलजवळ एक लहान अर्भक सुमारे तीन ते चार महिन्याचे जन्मन्या अगोदरचे पुरुष जातीचे अर्भक मयत अवस्थेत पडलेले होते. त्याच्या डोक्याला खरचटलेले होते व मुंग्याही लागलेल्या होत्या.
कोणीतरी अज्ञात इसमाने सदरचे अर्भक गुप्त रितीने विल्हेवाट लावण्याच्या उद्देशाने शेतात टाकुन विल्हेवाट लावली होती.
घटनास्थळी सपोनी शिवाजी जायपत्रे, हवालदार गोरख भोसले,प्रविण जाधव,रफिक शेख यांनी भेट देऊन पंचनामा केला आहे.अज्ञातावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.अधिक तपास सपोनी शिवाजी जायपत्रे करत आहेत.

Share Now

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *