सोलापूर जिल्हयात ७४१ कोरोनाचे नवे रुग्ण ; पैकी बार्शी शहर व तालुक्यात २०६

सोलापूर (प्रतिनिधी ) सोलापूर जिल्हयातील ग्रामीण व नगरपालीका मिळून कोवीड -१९ च्या रुग्णांमध्ये 741 रुग्णांची भर पडली आहे . बार्शी तालुका व नगरपालीका क्षेत्रात 206 रुग्णसंख्या झाली आहे . गुरुवार रात्री जिल्हयातील ग्रामीण व नगर पालीका क्षेत्रात नवीन 741 रूग्णांची भर पडली असून एकूण रुग्ण संख्या 50 ,318 झाली आहे. रुग्णालयातून बरे होऊन गेलेल्या बाधितांची संख्या 44 ,430 झाली आहे.तर रुग्णालयात उपचार घेत असलेल्या बाधितांची संख्या 4 ,612 आहे.
सोलापूर जिल्हा ग्रामीण भागात आज 7056 अहवाल प्राप्त झाले. असून यामध्ये 6315 निगेटिव्ह तर 741 पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले. यात 475 पुरुष आणि 266 महिलांचा समावेश आहे. 418 जण बरे झाल्याने त्यांना घरी सोडण्यात आले.

Share Now

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *