ऑनलाइन आंतरराष्ट्रीय अबॅकस परिक्षेत प्रभात लोखंडेचे यश तसेच वैरागचे ११ विद्यार्थी यशस्वी

यशस्वी विद्यार्थ्यांसोबत शिक्षिका – गीता रोकडे आणि वर्षा देशमुख

बार्शी (प्रतिनिधी ) अबॅकस ब्रेन स्टडी प्रा.लि. व्दारा १४ फेब्रुवारी रोजी आय सी एम ए एस संस्था पुणे व्दारा Online Abacus and Easy Math Exam हि परिक्षा घेण्यात आली . या अबॅकस परिक्षेमध्ये वैराग मधील अकरा विद्यार्थ्यांनी उज्वल यश संपादन केले आहे .परिक्षेमध्ये ७० गुण व १० मीनीट वेळ असून कमि वेळात जास्त प्रश्न सोडविणार्‍याचा अनुक्रमे प्रथम ,व्दितीय , तृतीय क्रमांक दिला जातो . त्याला फस्ट , सेकेंड , व थर्ड रनर असे संबोधले जाते . सदर परिक्षा १४ फेब्रुवारी रोजी ऑन लाईन घेण्यात आली असून त्याचा नुकताच निकाल लागला आहे .
यामध्ये वैराग मधील अक्षय अंकुश गावसाने ,शर्वरी अप्पासाहेब जाधव ,प्रभात बलभीम लोखंडे ,पूर्वा गणेश काळवणे ,
वेदांत जितेंद्र गरड ,आदित्य विश्वनाथ शिराळ ,
मानवी श्रीराम म्हसवडकर ,हिरा अमर कुलकर्णी ,आयान अकबर मुलानी या विद्यार्थ्यांनी यश मिळवले .
या अंतरराष्ट्रीय चॅम्पियनशिपमध्ये जवळजवळ चौदाशे विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला होता .या चंपियनशिप मध्ये भारतासह , कॅनडा ,अमेरिका पाकिस्तान ,साऊथ आफ्रिका आणि सिंगापूर या देशातील मुलांनी सहभाग नोंदवला होता .
यशस्वी विद्यार्थ्यांना अभिनव क्लासेसच्या गीता रोकडे आणि वर्षा देशमुख यांचे मार्गदर्शन लाभले .

प्रभात बलभीम लोखंडे
Share Now

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *