मराठा आरक्षणासाठी वैरागकरांचे शिवाजी चौकात आंदोलन


वैराग : मराठा आरक्षणाच्या मागणी साठी आज दि. २१ सप्टेंबर रोजी सोलापुर जिल्हा बंदला वैरागकरांनी उत्स्फुर्त प्रतिसाद देत सर्व व्यवहार बंद ठेवले . तसेच वैरागसह भागातील अनेक गावांत बंदला उत्स्फुर्त प्रतिसाद मिळाला .
सकल मराठा समाजाने ” मराठा आरक्षणासाठी ” वैराग बंद ची हाक दिली असता त्याला वैरागकर नागरिक , संतनाथ व्यापारी महासंघ , आडत व्यापारी आणि विविध राजकीय पक्ष व सामाजिक संघटनांनी जाहीर पाठिंबा दिला .
सकाळी ११ : ३० वाजता छत्रपति शिवाजी महाराज चौकात सकल मराठा समाजाच्या वतीने ” भगवा ध्वज ” अनावरण करून ११ तोफांची सलामी देण्यात आली . त्यानंतर हिंदवी स्वराज्य संस्थापक छत्रपति शिवाजी महाराज व छत्रपति शंभु राजे यांच्या प्रतिमेचे पुजन करण्यात आले.
यावेळी विविध घोषणा देण्यात आल्या , तसेच हक्काच ” आरक्षण ” मिळाल्याशिवाय स्वस्थ बसायच नाही अशी शपथ यावेळी शिव – शंभो प्रतिमेसमोर घेण्यात आली.
यावेळी पत्रकार व वैराग पोलीस स्टेशन चे अधिकारी , पोलीस कर्मचारी उपस्थित होते.आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर वैरागात पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.

मराठा आरक्षण आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर वैरागात संपूर्ण बाजारपेठ बंद ठेवण्यात आली .

वैराग येथे सकल मराठा समाजाच्या वतिने शिवाजी चौकात छत्रपती शिवाजी महाराज व शंभू महाराजांच्या प्रतिमेचे पूजन करून घोषणा देण्यात आल्या .

Share Now

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *