मध्यरात्री रात्री टेम्पो अंगावरून गेल्याने हत्तीजच्या तरुणाचा जागीच मृत्यू

वैराग (प्रतिनिधी )हत्तीज ता .बार्शी येथिल
शुभम गोवर्धन बनसोडे ( वय – २२ वर्षे )याचा टेम्पो अंगावरून गेल्याने जागीच मृत्यू झाला . सदरची घटना हिंगणी आर. ते रातंजन रोडवरील देशमुख यांचे शेताजवळील रोडवर हिंगणी आर.येथे रात्री १:३० वा सुमारास घडली . याबाबत अज्ञात टेम्पो चालकाविरुद्ध वैराग पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल झाली आहे .
.याबाबत माहिती अशी की , गुरुवार ११ फेब्रुवारी दुपारी चार ४ वा . सुमारास शुभम व त्याचा मित्र विकास कुंडलिक खुटे हे मोटर सायकल (एम एच २५ ए ए ७६८५ ) वरून रातंजन शिवारातील शेतामध्ये ज्वारीस पाणी देण्याकरिता गेले होते . रात्री ९ वाजेपर्यंत शेतामध्ये त्यांनी पिकास पाणी दिले . रात्री रानडुकरे ज्वारीच्या पिकाचे नुकसान करतात म्हणून राखणीसाठी तो तेथेच थांबला होता.शुभम व विकास रात्री एक वाजता शेतातून हत्तीजकडे येत असताना हिंगणी आर ते रातंजन रोडवरील देशमुख शेतालगत रोडवर मोटरसायकल बंद पडल्याने मोटारसायकल रोडच्या कडेला लावून तेथेच थांबले . शुभम हा मोटर सायकल जवळ खाली बसला व विकास लघवी करण्यासाठी रोडच्या खाली गेला असता दीड वाजण्याच्या सुमारास सर्जापूर कडून आयशर कंपनीचा टेम्पो भरधाव वेगात आला त्याने शुभमला जोराची धडक देऊन वेगात पुढे निघून गेला .जखमी शुभमला पुढील उपचारासाठी वैराग – बार्शी येथे नेण्यात आले .बार्शी ग्रामीण रुग्णालयातील डॉक्टरांनी शुभम मृत झाल्याचे सांगितले . मृत मुलाचे वडील गोवर्धन भानुदास बनसोडे यांनी अज्ञात आयशर टेम्पोच्या चालकाविरुध्द वैराग पोलिसांत फिर्याद दिली आहे.

Share Now

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *